ग्रामपंचायत चिंचलेखैरे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

"अतुल्य चिंचलेखैरे, पर्यटन समृद्ध चिंचलेखैरे"

ग्रामपंचायत चिंचलेखैरे, ता. इगतपुरी, जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

whatsapp image 2025 09 13 at 12.23.41 pm
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

चिंचलेखैरे ता. इगतपुरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातीतील नाशिक जिल्ह्यातल्य इगतपुरी तालुक्यात वसलेले एक अतिदुर्गमभागात डोंगराळ भागात वसलेले आहे सुंदर गाव आहे. चिंचलेखैरे हे गाव मुंबई महामार्ग घाटन देवि मंदिर खाली कसारा घाटातील डोंगर रंगामध्ये वसलेले आहे .

 गावाची लोकसंख्य२०११च्या जनगणनेनुसार ११८९  इतकी आहे  तसेच २०२५ची १६४१ आहे येथील घरांची एकूण संख्या २७६  इतकी आहे. येथील स्त्रियांची लोकसंख्या एकूण लोकसंखेच्या ४८.८% इतकी असून स्त्री साक्षरतेचे प्रमाण ३०.८% आणि एकूण साक्षरतेचे प्रमाण ५८.२% इतके आहे. चिंचलेखैरे हे  गाव नाशिक जिल्ह्यापासून ६२  कि.मी. तसेच इगतपुरी येथून १०  कि.मी. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून १३०  किमी वर स्थित आहे.

चिंचलेखैरे येथे साध्रणात: ३००० मी मी पाऊस पडतो.त्त्यामुळे पावसाळ्यामध्ये गावचे सौंदर्या धबधबे ,झरे यांनी अधिक खुलून दिसते. चिंचलेखैरे येथे २७७ हेक्टर एवढी वन जमीन आहे. तसेच पिका खालील एकूण क्षेत्र ५६७ हेक्टर एवढे आहे. चिल्चिंचलेखैरे येथे प्रामुख्याने भात,वरई,नागली ही पिके गघेतली जातात.चिंचलेखैरे गावाला ५ वाड्या असून त्या खाजगी गटामध्ये वसलेल्या आहेत चिंचलेखैरे पश्चिम दिशेला त्रिंगलवाडी धरण आहे तरी त्रिंगल वाडी किल्ला ही जवळ च आहे.

 ग्रामपंचायतीस घरपटटी, नळपटटी हया सारखे प्रमुख उत्पन्नाचे स्त्रोत आहे. ग्रामपंचायतीने गावाच्या विकासा बरोबर शासनाच्या अनेक योजनांच्या माध्यमातुन वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये इंदीरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, समाज कल्याण विभागाच्या योजना, अपंगासाठी शासनाचे योजनेतुन साहीत्य वाटप, राष्ट्रीय वृध्दापकाळ पेन्शन योजना, संजय गांधी निराधार योजना हया सारख्या शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवुन दिला आहे.

ग्रामपंचायत दरवर्षी उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने विविध प्रकारे प्रयत्न करत असुन सध्या ग्रामपंचायतीचे वार्षीक निव्वळ उत्पन्न १ ते २  लाख रूपये पर्यंत आहे. तसेच ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना मुलभुत सोयी सुविधा तसेच समाज उपयोगी अनेक विकासकामे करून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

चिंचलेखैरे  गावातील मेन रस्ते डांबरीकरण / काँक्रीटीकरण करण्याचे काम पुर्णत्वास येत आहे. त्यासाठी स्थानिक आमदार निधी, ठक्कर बाप्पा योजना, पर्यावरण योजना निधी, जनसुविधा निधी द्वारे रस्ते काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. गावातील सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत संपुर्ण गावात भुमिगत गटार / शोषखडडे व धनकचरा शेड बांधण्यात आल्या असुन त्याचे पाणी शोष खड्या मध्ये सोडले जाते.गावामध्ये ३ शाळा ,३ आंगण वाडी केंद्र आहेत त्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गावा मध्ये २ कि मी रस्त्याचे यांचे काम ग्रामपंचायती ने केलेले आहे. व जल जिवन मिशन योजना अंमल बजावणी करण्यात आली आहे

📍 चिंचलेखैरे गावांतर्गत जिल्हा परिषद शाळांची माहिती खालील प्रमाणे:

गावात जिल्हा परिषद शाळेची स्थापना दिनांक १६/०९/१९५६  रोजी झालेली असून तेथे इयत्ता १ली ते ८ वी पर्यंत वर्ग असून शाळेत मुलांची संख्या ७६ व मुलींची ८० संख्या  आहे. एकुण १५६आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. लहान वयातच मुलांच्या आकलनशक्ती वाढविण्यासाठी योग्य पद्धतीचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. खाजगी शाळांमध्ये चढाओढ सुरू झाली असून जिल्हा परिषद शाळांपुढे त्या दृष्टीने चिंचलेखैरे शाळा तालुका पातळीवर उत्कृष्ट असुन इमारत व संगणक कक्ष व इतर सोई सुविधा युक्त आहे.

 चिंचलेखैरे शाळा येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील जिल्हा परिषद शाळा आधुनिक करण्याचा संकल्प केला असून खाजगी शाळेकडे वाढलेला कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा ही ओसाड होत चालली आहे त्यासाठी जिल्हा परिषद शाळा देखील आधुनिक होणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वारंवार व्यक्त होत आहे.त्याअंतर्गत चिंचलेखैरे येथील प्राथमिक शाळा डीजीटल झालेली आहे.

🏞️ भौगोलिक वैशिष्ट्ये

गावाभोवती हिरवीगार शेतं, छोटे डोंगर, पावसाळ्यात ओसंडून वाहणारे नाले आणि झरे ही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. गावाच्या शेजारी काही छोटे धरणे व तलाव आहेत, जे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी उपयुक्त ठरतात. या परिसरामुळे येथे पर्यटनाची संधीही वाढू लागली आहे. काही ठिकाणी होमस्टे व रिसॉर्ट्सची उभारणी होत आहे.
सदरील गाव हे पेसा क्षेत्रांतर्गत येते.

🛠️ सुविधा
  • पाणीपुरवठा:

    1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती

    चिंचलेखैरे गावात सन १९८० पूर्वी

    विहीर, बारव व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते. सन १९८०-८१ मध्ये पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४० हजार लि क्षमतेचा जलकुंभ बांधून संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली. परंतु चिंचलेखैरे हे अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने माहे फेब्रुवारी ते  माहे मे पर्यंत पाणी टंचाई भासते.तसेच ही पाणीपुरवठा पुरवठा योजना जुनी झाल्याने दुरुस्तीची गरज होती.

    1. नवीन योजनेला कधी मंजुरी मिळाली

    सन २०२२ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत चिंचले खैरे येथे नवीन पाणीपुरवठा योजना जल जिवन मिश न अंतर्गत योजना मंजूर असून सदर योजनेचे काम प्रगती मध्ये सुरु आहेआहे लवकरच सदरची पाणीपुरवठा योजने चे काम पूर्णत्वास येऊन गावातील प्रत्येक कुटुंबाना १०० % नळाद्वारे पाणी मिळणार आहे.

  • स्वच्छता: गावात एकूण 167 शौचालये असून 165 कुटुंबांचे सांडपाणी गटारीस जोडलेले आहे.

  • पोस्ट ऑफिस: इगतपुरी (सब-ऑफिस), इगतपुरी

  • बँक सुविधा: इगतपुरी येथे (सुमारे 12 कि.मी. अंतरावर)

चिंचलेखैरे येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग

शेती व भूवापर

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंड जनगणना माहिती
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

खरोली २०११ च्या जनगणनेचा तपशील

खरोलीची स्थानिक भाषा मराठी आहे. खरोली गावाची एकूण लोकसंख्या १०४८ आहे आणि घरांची संख्या १६७ आहे.
महिला लोकसंख्या ५०.५% आहे. गावातील साक्षरता दर ४५.६% आहे आणि महिला साक्षरता दर १७.९% आहे.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
whatsapp image 2025 09 18 at 8.06.17 pm

मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या सोबत विविध उपक्रम

whatsapp image 2025 09 18 at 8.06.16 pm

व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे

whatsapp image 2025 09 18 at 8.06.15 pm (1)

गावासाठी ४० हजार लि क्षमतेचा जलकुंभ

गावातील सविस्तर माहिती

शासन निर्देशित उपक्रम साजरे करताना

एकुण ३ जि.प शाळा 1.खरोली गाव (इयत्ता पहिली ते पाचवी) 2. मास्तरवाडी (इयत्ता पहिली ते पाचवी) 3. दोनही शाळा या विद्यार्थ्यांना अध्ययनात अभिरुची निर्माण व्हावी याकरिता पंचायतीमार्फत पुरवठा करण्यात आलेल्या तंत्रज्ञान युक्त स्मार्ट टीव्ही संच व इतर शैक्षणिक साहित्य सोबत संगीत साहित्य पुरवठा असलेल्या सर्व सुविधा नियुक्त शाळा आहेत

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत आहे: होय (खारोली स्वतःची ग्रामपंचायत आहे) जवळचं तहसील ठिकाण: त्र्यंबक (~20 किमी) जवळचं जिल्हा ठिकाण: नाशिक (~45 किमी)

शिक्षण

सामान्य साक्षरता दर: ~56.84% पुरुष साक्षरता: ~68.72% महिला साक्षरता: ~44.87%

खरोली येथील लोकसंख्या व शेती विषयक माहिती खालीलप्रमाणे आहे

अनुसूचित जाती (SC) व
अनुसूचित जमाती (ST) लोकसंख्या

कामगार वर्ग (Workforce)

शेती व भूवापर

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (44)
your paragraph text (45)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.

📲 चिंचलेखैरे ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

फोटो गॅलरी